धणोजे कुणबी संरक्षण भिंत भूमिपूजन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गणेश टोंगे
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे गावाच्या विकासासाठी ना सुधिर मुनगंटीवार नेहमीच तत्पर असतात कारण म्हणजे विसापुरात नेहमीच नवनवीन कामांना मंजुरी दिली जाते.
नुकत्याच पार पडलेल्या धनोजे कुणबी सभागृहाच्या संरक्षण भिंतीकरिता 15 लक्ष 93 हजार रुपयांच्या निधी राज्याचे वने सांस्कृतिक तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी निधी मंजूर करून दिले त्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या भमिपुजन सोहळ्याला उपस्थित धनोजे कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा वीणाताई नांदे, भाजप चिटणीस विद्या देवालकर, ग्रामपंचायत सदस्या शारदा डाहुले, भाजपा उपाध्यक्ष संदीप पोडे,बंडू नांदे, किशोर चोपडे, कुणाल लोखंडे, मंगेश टोंगे, सचिन टोंगे, अन्वर शेख, नरेश वाटकर, आकाश टोंगे, राहुल टोंगे, आणि उपस्थित समाजबांधव हजर होते.