ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका नियमित व्हाव्यात.

नंदिनी चुनारकर, अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर

चांदा ब्लास्ट

ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ मधील कलम ८ च्या पोटकलम( १) अन्वये स्थापन केलेली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांच्या मासिकं बैठकी नियमित व्हाव्यात.अशी मागणी नंदिनी चुनारकर अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे पाठविलेल्या एका निवेदनातून केली आहे.

ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ नुसार महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (राज्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद)नियम २०२२ नुसार स्थापन केलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांचा कालावधी तिच्या स्थापनेच्या दिनांकापासून तीन वर्षांचा आहे.

प्रत्येक महिन्यातून किमान एकदा म्हणजेच एका वर्षात १२ पेक्षा कमी असणार नाही इतक्या बैठका घेण्याबाबत नियमांत म्हटले आहे.

दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ च्या आदेशानुसार अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी १७ अशासकीय सदस्यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड जाहीर केली आहे. परंतु अद्यापपर्यंत एकही बैठक आयोजित झाली नाही.

त्यामुळे दर महिण्याला नियमितपणे बैठक आयोजित करून ग्राहकांचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा.अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर सदस्य नंदिनी चुनारकर, संगिता लोखंडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये