ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयाचे तालुकास्तरीय प्रशिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे उत्साहात पार पडले,

जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 150 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच दुसऱ्या टप्प्यात दिनांक २६/१२/२३पासुन इयत्ता पहिली ते पाचवीच्या 150 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे पुढील टप्प्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात जागतिक दर्जाची स्वीकार्यता असलेले मुल विकसित करणे शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमतांचा उपयोग करणे पिसा रेडी मूल तयार करणे आणि हे करण्यासाठी शिक्षकांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे तसेच भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या एकविसाव्या शतकासाठीची कौशल्य मुलांना स्वतः शिकण्यात प्रेरित करणे त्यांना विविध आव्हाने देणे व आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनविणे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वृत्तीचा सन्मान करणे शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन करण्यात आले मेटाकॉग्रीशन सेल्फी विथ सक्सेस भविष्यवेधी शिक्षणाचे चार आयाम आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण अशा नवनवीन संकल्पना वर आधारित गटचर्चा आव्हान पुस्तिका व चित्रफितीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी श्री पंढरी मुसळे व श्री विलास देवाळकर विस्तार अधिकारी शिक्षण व श्री विकास भंडारवार साधन व्यक्ती तसेच कुमारी लीना झाडे साधन व्यक्ती गटसाधन केंद्र कोरपणा यांनी पार पाडली या प्रशिक्षणात राज्य सुलभक विकास भंडारवार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले . या प्रशिक्षणात सुलभक म्हणून श्री मंगेश साखरकर श्री विशाल बोदाने श्री दीपक झाडे श्री सचिन कांबळे श्री भगवान नागरगोजे श्री राजीव धोटे श्री सुनील अलोने श्री अनिकेत जयपुरकर श्री चाचरकर सर यांनी कार्य केले.

या प्रशिक्षणाचे महत्त्व सांगताना सचिन कुमार मालवी (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना)यांनी सांगितले की मुलांना 21 व्या शतकासाठी तयार करताना ते स्वतःहून शिकतील त्यांच्यामध्ये जिज्ञासा वृत्ती विकसित होईल आव्हाने पेलण्यास स्वीकारण्यास ते सक्षम बनतील व स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील या दृष्टीने शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे या प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात आली आहे यामध्ये व्हिडिओ पाहून त्यावर चिंतन करणे व आपले विचार आव्हान पुस्तिकेत लिहिणे हा या प्रशिक्षणाचा आत्मा आहे या प्रशिक्षणामुळे श्रम निमे परिणाम दुप्पट व आनंद तिप्पट मिळणार आहे या प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी प्रत्यक्षात कृतीत उतरवावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये