ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँक ऑफ इंडियाच्या वनसडी शाखेतील सी.डी.एम. मशीन कोरपण्यात बसवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना परिसरातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी तील सीडीएम मशीन कोरपना येथील एटीएम किंवा वनसडी शाखेच्या बाहेर बसवावी अशी मागणी खातेदारांकडून होते आहे.

कोरपना तालुक्यात बँक ऑफ इंडिया ची वनसडी येथे एकमात्र शाखा आहे. या बँकेला मोठा परिसर जोडला असल्याने येथे लक्षणीय गर्दी असते. याकरिता कॅश डिपॉझिट साठी सीडीएम मशीन लावण्यात आली आहे. मात्र ही मशीन शाखेतच आहे. ती मशीन ग्राहकाच्या सोयीच्या दृष्टीने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपना किंवा वनसडी येथे राष्ट्रीय महामार्गावर लावणे आवश्यक आहे.

बरेच जणांना ही मशीन शाखेत असून सुद्धा कल्पना नाही. त्यामुळे येथे लांबलचक रांगा नेहमीच बघायला मिळतात. वनसडी येथे पूर्वी बँके पुढे एटीएम होते. तेही बंद करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होते आहे. वनसडी ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथून राजुरा – कोरपना राष्ट्रीय महामार्ग, चंद्रपूर राज्य महामार्ग व जिवती कडे जाणारा मार्ग जोडला आहे. नारडा येथील दालमिया सिमेंट उद्योग, विरूर् कोळसा खाण ही जवळच आहे.

त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. तसेच वनविभाग, तलाठी साजा, अलोपथीक दवाखाना, शाखा डाक घर, विविध सेवा सहकारी संस्था येथेच असल्याने आवक मोठी आहे. त्या दृष्टीने चोवीस तास कॅश मिळण्यासाठी एटीएम व सी डी एम सेवा असणे गरजेची आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये