ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह नाल्यात आढळला

ढोरवासा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

घरून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ढोरवासा- चारगाव रस्त्यावरील नाल्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना ढोरवासा- चारगाव या मार्गावरील नाल्यात दिनांक 29 रोज शनिवारला सकाळी उघडकीस आली. वंदना वसंता वरखडे वय 45 वर्षे, राहणार, ढोरवासा असे या मृतक महिलेचे नाव आहे. पुलावरून जाताना पाण्यात वाहून जाऊन तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता परिसरात व्यक्त केल्या जात आहे.

मृतक महिला ही दिनांक 28 ला दुपारी तीन वाजता पासून आपल्या ढोरवासा येथील घरातून निघून गेली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रारही करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी गावातील एक जोडपे या रस्त्याने जात असताना नाल्यातील झुडपात तीचे प्रेत अडकलेले दिसले.

याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तिचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक महिलेला दोन मुली व एक मुलगा आहे. तिच्या मृत्यूमुळे ढोरवासा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये