ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपुर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

रविंद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट

ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर काल त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता.

आज जनता कॉलेज नागपुर महामार्गावर स्थानीय जनता काॅलेज चौकामधे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानपरिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमापत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात वसातिगृह या मागण्यांसह सुरु झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये