ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पी एम श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे किशोरवयीन मुलांचे उद्बोधन

पोलीस निरीक्षक निशा खोब्रागडे यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पंचायत समिती कोरपना अंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे किशोरवयीन मुलांना पोक्सो कायद्याविषयी माहिती देण्यात आली तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस स्टेशन गडचांदूर येथील उपनिरीक्षक निशा खोब्रागडे होत्या तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वडगावच्या पोलीस पाटील कलावती मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित शाळेतील सर्व मुलांना गुड टच बेड टच शासनाने सुरू केलेल्या विविध वेबसाईट व टोल फ्री क्रमांक याबाबतची माहिती तसेच बाल लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध घटना व प्रसंग हे यावेळी खोब्रागडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना सांगितले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम पाच भाई सदस्य कैलास मेश्राम अंगणवाडी सेविका मालती पावडे शारदा गुरनुले ममता पिंगे तसेच शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके वसंत गोरे शिवाजी माने पुष्पा इरपाते अनिल राठोड नितीन जुलमे उपस्थित होते सूत्रसंचालन काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार पुष्पा इरपाते मॅडम यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये