ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा कारागृह येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम शिबीर

जिल्हा क्षयरोग केन्द्र, वर्धा व ICMR यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्हा क्षयरोग केन्द्र, वर्धा व ICMR यांच्या संयुक्त विद्यामाने वर्धा जिल्हा कारागृह येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये वर्धा जिल्हा कारागृह येथील संशयीत क्षयरुग्णांची तपासणी तसेच Handy Digital X-Ray Machine च्या माध्यमाने बंदयाचे Digital X-Ray नुसार तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, वर्धा व ICMR चे वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळया ठिकाणी शिबीराचे आयोजन करुन सदर तपासण्या करण्यात येत आहे.

आज दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी कारागृह अधिक्षक श्री. एस.आर.पवार यांच्या सहकार्याने कारागृहातील बंदयांकरीता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण जनजागृती कार्यक्रम अंतर्गत वर्धा जिल्हा कारागृहातील संशयीत क्षयरुग्णांची Handy Digital X-Ray Machine च्या माध्यमाने बंदयाचे Digital X-Ray नुसार तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमा दरम्यान लाभार्थ्यांना या आजाराबद्दलची माहीती, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय निदान झाल्यावर दिले जाणारे उपचार याबाबत माहीती देण्यात आली. या सर्व आजाराचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे मोफत दिले जात आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्षयरोग केंद्र, वर्धा येथील मा.डॉ. हेमंत पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी, वर्धा, श्री.ए.एस.खोब्रागडे, आरोग्य सहाय्यक, श्री.सुमंत ढोबळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, श्री. संजु सोनटक्के, TBHU, कु. साधना कोसारे, DRTB, श्री. वैभव मेघरे, स्वयंसेवक, तसेच ICMR यांचेकडील डॉ. अरविंद प्रधान, वैद्यकिय अधिकारी, ICMR श्री. सोनु नागवंशी, X-Ray टेक्नीशियन, श्री. सतिश राऊत, लॅब टेक्नीशियन, तसेच करागृह अधीक्षक, श्री.एस.आर.पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. नितीन क्षिरसागर, तुरुंगाधिकारी श्री. सुहास नागमोते, श्री. अमित कोठाकर, शिपाई उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये