ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती उत्खननाने निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधारा धोक्यात

कोल्हापुरी बंधारा जवळील वाळू उपसा बंद करण्याचे पाटबंधारे विभागाचे तहसिलदारांना पत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती चे उत्खनन करून खुलेआम वाहतूक सुरू आहे.

सदर वाळु उत्खननामुळे निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधारा चे अस्तित्व धोक्यात आले असल्याने बंधारांची पावसाळ्यात मोठी हानी होऊन बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने उपविभागीय अधिकारी पाटबंधारे मेहकर यांनी सिंदखेडराजा तहसिलदार यांना 7 मे रोजी पत्र देऊन कोल्हापुरी बंधारा जवळील वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधारा जवळील 100 ते 200 फुटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेती चे उत्खनन सुरू आहे.

उपरोक्त विषयानुसार या कार्यालयांतर्गत सिंचन शाखा, दुसरबीड अंतर्गत असलेल्या निमगाव वायाळ कोल्हापुरी बंधारा जवळ वाळू उपसा चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बंधाऱ्याजवळ वाळू उपसा करीत असल्याने बंधाऱ्यास धोका निर्माण होऊ शकतो. तरी संबंधितांना सुरक्षित अंतर राखून वाळू उपसा करण्यास परवानगी द्यावी जेणे करून बंधाऱ्यास कोणताही धोका निर्माण होणार नाही. करीता पत्रव्यवहार केला आहे मात्र संबंधित पत्रव्यवहारावर महसूल विभाग कारवाई करून वाळू उत्खनन बंद करेल का, की या पत्राला केराची टोपली दाखवेल यावर ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये