महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम होते प्रमुख पाहुणे उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे ,एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे समिती प्रमुख प्रा नंदा भोयर, माधुरी मस्की, श्र्वेतलाणा टिपले उपस्थित होत्या.
सर्वप्रथम डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गौरी पेंदोर व अनिकेत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, संचालन कू महेक शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन रेणुका आत्राम हिने मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,समितीतील सभासद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.