ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे मंत्रालयाशी संबंधित ओबीसी रोस्टर, आरक्षण व अन्य प्रश्नांवर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे सुनावणी

विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना रेल्वे सोयीसुविधा बहाल कराव्यात - हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाशी संबंधित ओबीसी आरक्षण व अन्य प्रश्नांबाबत दि. 13 डिसेंबर 2023 रोजी जनसुनावणी घेतली आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या जनसुनावणीत ओबीसी प्रवर्गाशी निगडीत असलेल्या अनेक महत्वपुर्ण बाबींवर अध्यक्षांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य भुवनभूषण कमल, आयोगाचे सचिव यांचे उपस्थितीत पार पडलेल्या या सुनावणीला रेल्वे मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ओबीसी आरक्षणाबाबत आयोगाने सविस्तर आढावा घेतला. रोस्टरबाबत चर्चा केली. ओबीसींचे बॅकलाग त्वरीत भरण्याचे निर्देश दिले. जनसुविधा विषयक प्रवाशांच्या शेकडो तकारी असून त्या तकारींचे गांभीर्याने दखल घेत सोईसुविधा उपलब्ध करण्यावर वरीष्ठांनी भर देण्याची सुचना केली.

विदर्भासह चंद्रपूर, बल्लारशाह, रेल्वे विषयक समस्यांवरही सुनावणी दरम्यान एनसीबीसीचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित अधिका-यांचे लक्ष वेधत सोईसुविधांबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची सुचना केली. कोरोना संक्रमण काळात विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महत्वपुर्ण रेल्वे गाड्या बंद झालेल्या होत्या परंतू त्या अजूनही सुरू न झाल्याने पुर्ववत सुरू करीत प्रवाश्यांचा अधिकार अबाधित ठेवावा. चंद्रपूर जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी व अन्य प्रवर्गातील प्रवाश्यांना होणारा त्रास व मनःस्ताप दूर करावा. यावेळी बल्लारशाह ते मुंबई व पुणेकरीता पर्याप्त रेल्वे सेवा सुरू करावी. काजीपेठ, पुणे गाडी आठवड्यातून 3 दिवस सुरू करण्यात यावी. तसेच बल्लारशाह पिटलाईनचा वापर त्वरीत सुरू करण्याचे निर्देशही आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी या सुनावणीमध्ये दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये