ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयाचे बास्केटबॉल खेळात सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदा येथील बास्केटबॉल खेळाच्या पुरुष संघाने गोंडवाना विद्यापीठा द्वारे आयोजित आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. गुरुकुल महाविद्यालयाच्या संघाने आनंद निकेतन महाविद्यालय, नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संघांचा साखळी सामन्यात पराभव करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व क्रीडा संचालक प्रा. आशिष पईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने हे यश प्राप्त केले. या बास्केटबॉल संघात तेजस मडावी, गणराज हेपट, आशुतोष लिहितकर, संस्कार खिरटकर, देवेंद्र देठे, प्रशांत धांडे, तेजस ठाकरे या खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उत्तुंग यशाकरिता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनिता ताई लोढीया, सचिव डॉ. अनिल मुसळे, सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये