ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य टिळक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

चांदा ब्लास्ट

भारती विद्यापीठ पुणे तर्फे सप्टेंबर 2023 मध्ये इंग्रजी व गणित बहि: स्थ परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक विद्यालयाचे विद्यार्थी या परीक्षेत बसले होते यामध्ये वर्ग 10 वा ,(क) चा विद्यार्थी तेजस सुरेंद्रमोहन दुर्सेलवार याने गणित- प्रवीण परीक्षेत राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या यशाचे श्रेय त्याने गणित विषयाच्या शिक्षिका सौ. श्रीगडीवार मॅडम व श्री तेलंग सर तसेच आपल्या पालकांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ॲड. रवींद्रजी भागवत, उपाध्यक्ष श्री. ॲड.प्रशांत जी घट्टवार ,सचिव श्री. गांगेय जी सराफ तसेच मुख्याध्यापिका श्रीमती. पाटील मॅडम ,उप मुख्याध्यापक श्री. राजपुरोहित सर ,पर्यवेक्षक श्री. जहागिरदार सर,पर्यवेक्षिका सौ. देगमवार मॅडम आणि शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये