विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनेचा १९ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडक मोर्चा – कॅस्ट्राईब संघटनेच्या विभागीय सचिवांची माहिती

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
कॅस्ट्राईब रा.प.म. कर्मचारी संघटनेचा दिनांक १९/१२/२०२३ रोजी नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला असून मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस सुनिल निर्भवणे व अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे हे मोर्चाचे नेतृत्व करतील. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अजुनही प्रलंबित असुन प्रामुख्याने एस. टी. कामगारांना शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी. सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली विसंगती दूर करण्यासाठी मुळ वेतनात सरसकट रु.५०००/- वाढ करण्यात यावी ह्या प्रमुख मागणीसह पुढील मागण्या घेऊन हे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विधानभवनावर धडकणार आहेत.
१ एप्रिल २०१६ पासून प्रलंबित वार्षीक वेतनवाढीचा १ टक्का फरक व घरभाडे भत्त्याचा १,२,३ तत्काळ अदा करण्यात यावा.
यापुर्वी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फरक देणे आहे. मागील काही वर्षापासून शिल्लक आहे. तो तातडीने देण्यात यावा., मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बढतीतील अनुशेष त्वरीत भरण्यात यावा., शिस्त व आवेदन पध्दतीत बदल करण्यात यावा., सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या मागील कराराच्या रकमेची व रजारोखी करण्याच्या रकमेची थकबाकी तातडीने एकरकमी देण्यात यावी. या मागण्यांसाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.