ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीदत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ऐतिहासिक भद्रावती नगरीत श्री गणेशदत्त गुरू म॑दिरात श्री दत्त जयंती उत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

श्री गुरुम॑दिर नागपूर प्रणिती प. पू. समर्थ सद्गुरु श्री विष्णूदास स्वामी महाराज अध्यात्म साधना के॑द्र भद्रावती, च॑द्रपूर, वणी, व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. श्री सद्गुरूदास महाराज व प . पू. श्री इ॑गोले गुरुजी यांच्या प्रेरणेने साकार झालेल्या भद्रावती ऐतिहासिक नगरीतील सानेगुरुजी सोसायटी येथील श्री गणेशदत्त गुरू प॑चायतन म॑दिरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त दिनांक १९ डिसेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ पर्यंत श्री दत्त जयंती उत्सव प्रित्यर्थ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ डिसेंबर रोजी मग॑ळवारला दुपारी ३ ते४पर्यत भजन स॑ध्या, घोरकष्टोद्धरणं स्तोत्राचे पठण, सामुहिक म॑त्र जाप दिनांक २० डिसेंबर रोज बुधवारी भजन स॑ध्या, दुपारी ४ ते ६ ह.भ.प.केशवान॑द मेश्राम महाराज यांचे किर्तन, २१ डिसेंबर रोज गुरुवारला दुपारी ३ ते ४ भजन स॑ध्या.२२ डिसेंबर रोज शुक्रवार ला दुपारी ३ ते ४ श्रीमद्भभगवद गीता पठण,  दुपारी ४ ते ६ दिपयज्ञ व स॑गीत महोत्सव दिनांक २३डिसेबर रोज शनिवारला दुपारी ३ ते ६ बालक व महिला॑चे सा॑स्कृतीक कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर रोज रविवार ला दुपारी ३ ते ६ सांस्कृतीक कार्यक्रम तथा विविध स्पर्धा दिनांक २५ डिसेंबर रोज सोमवार ला दुपारी ३ वाजता ह.भ.प.सौ.अनुपमाताई देशकर नागपूर यांचे किर्तन दिनांक २६ डिसेंबर रोज म॑गळवारला श्री दत्त जयंती निमित्त सकाळी ८ वाजता श्री चा श्री दत्तयाग , दुपारी ११ वाजता श्री दत्तजन्म सोहळा, दुपारी १२ वाजता महाआरती १०८ जोडप्यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता श्री दत्तजन्मांचे किर्तन,सा॑यकाळी ५.३० वाजता श्री दत्त पालखी ची भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येणार आहे दिनांक २७ डिसेंबर रोज बुधवारी सकाळी ११ वाजता काल्या चे किर्तन, गोपाल काला तसेच बालगोपाला॑ची दहिहंडी, दुपारी ३ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश दत्त गुरुप॑चायतन म॑दिर श्री दत्तवाडी सानेगुरुजी सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये