ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे नविन हिंदू स्मशानभुमी तयार करण्यात यावी

नागरिकांनी केली नगरपरिषदकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगावराजा शहरातील नागरिकांची गैरसोय पाहता शहरातील नागरिकांनी एकत्र येत मुख्यअधिकारी यांना एका निवेदनाद्वारे विनंती अर्ज करण्यात आला आहे देऊळगांवराजा शहरातील जुनी स्मशानभुमी 2.5 ते 3 कि.मी. अंतरावर असल्यामुळे अंतयात्रा जाण्यास खुप त्रास सहन करावा लागतो तसेच जुन्या स्मशानुभमीमध्ये 3 व्यक्तींची दहन करण्याची व्यवस्था असल्यामुळे कधी-कधी कटघरात दहन विधी करता खाली जमीनीवर दहन विधी करावा लागतो त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे.

त्यामुळे देऊळगांवराजा शहराच्या पुर्वकडील बाजुस असलेले खंडोबा टेकडीच्या बाजुला हिंदू स्मशानभुमी तयार करुन त्यास कटघर, संरक्षण भिंत व शेड तयार करण्यात यावे जेणे करुन परिसरातील नागरीकांची
गैरसोय होणार नाही. देऊळगांवराजा शहरातील आदर्श कॉलनी, बालाजी नगर, भगवान बाबा नगर, समता कॉलनी, अमृत नगर, गजानन नगरी, श्रीराम नगर, सम्राट कॉलनी, वाल्मिक नगर व गजानन महाराज मंदीर परिसरातील नागरीकानी एक विनंती अर्ज मुख्याधिकारी यांना देन्यात आला आहेत त्यात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव,प्रदिप वाघ,राजेन्द्र डोईफोडे, सुनिल शेजुळकर,सुधाकर वरपे, राजेश पंडित, नितीन अंभोरे, राजेश बोराटे, अंबादास नागरे शुभम जायभाये, बंडू झोरे,असंख्य अश्या नागरिकाच्या स्वाक्षरी आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये