ताज्या घडामोडी

तालुका स्तरीय दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम – गट साधन केंद्र राजुरा ने केले आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, चंद्रपूर, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण, गट साधन केंद्र, पंचायत समिती राजुराच्या ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती राजुराचे गटशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2023 दरम्यान जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला.

इंदरा गांधी डिजीटल प्राथ. शाळा राजुरा येथे 5 डिसेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस नृत्य स्पर्धा, निबंध स्पर्धा यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या  सुरुवातीला लुईस ब्रेल व हेलन केलर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण विस्तार अधिकारी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय परचाके व शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकर, संजय हेडाऊ, शाळेचे मुख्याध्यापक बंडु ताजने ह्यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष शिक्षक राजकुमार भुरे, प्रास्ताविक समावेशित तज्ज्ञ देवेंद्र रहांगडाले ह्यांनी केले. आशिष बहादुरे, समावेशित तज्ज्ञ, साधन व्यक्ती राकेश रामटेके, मुसा शेख साधन व्यक्ती, ह्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विषय शिक्षिका निला डोरलिकर यांनी केले. कार्यक्रमात 45 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक दिवाकर चाचरकर, मंगला सोमलकर, मनिषा वांदिले, विषय साधन व्यक्ती रिता देरकर, गिता जांबुलकर ज्योती गुरनुले, अजय सुर्यवंशी, राहुल रामटेके, राजु रामटेके,  गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी, इंदिरा गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक ह्यांनी परिश्रम केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये