ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लालगुडा जि. प. शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 पंचायत समिती कोरपना अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे नुकताच शाळा पूर्व तयारी मेळावा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी व केंद्रप्रमुख पंढरी मुसळे यांच्या प्रेरणेतून संपन्न झाला.

         मेळाव्याच्या सुरुवातीला गावामध्ये जनजागृती साठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली .रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. लेझीम च्या गजरात सजलेल्या बैलगाडीतून इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी केले तर शाळा पूर्वतयारी चे महत्व व त्याचे आयोजन नियोजन कसे करायचे, त्यात माता पालक ,अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांची जबाबदारी काय असणार या विषयी सविस्तर माहिती शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी सांगितली .त्यानंतर मेळाव्याच्या उद्घाटिका वर्षा कोडापे यांनी फीत कापून प्रत्यक्ष मेळाव्याला सुरुवात केली. तदनंतर शैक्षणिक स्टॉलच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांची कला,गुण व कौशल्याची पडताळणी करण्यात आली.तसेच त्यांना पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.

       या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून फकरू मरस्कोल्हे तर उ्दघाटिका म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वर्षा कोडापे, प्रमुख अतिथी भिकाजी सिडाम, मोतीलाल तोडासे,देवराव सोयाम,लक्ष्मण कोडापे, रेणुकाबाई तोडासे, पार्वताबाई कोटनाके, गणेश कोडापे,विनोद कोटनाके,रमेश कोडापे ,सुरेश सोयाम, आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये