ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

विद्यार्थी व विद्यार्थिनीने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून रक्तदान केले

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक, वडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक पी.एस. आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबीर संत साईनाथ ब्लड सेंटर हॉस्पीटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

ह्या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे संस्थापक पी.एस.आंबटकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी डीफॉर्मचे विध्यार्थी, सोमय्या प्रायव्हेट आय.टी.आय. चे विद्यार्थी व विद्यार्थिनीने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून रक्तदान केले. त्याच प्रमाणे सोमय्या पॉलीटेक्नीकच्या शिक्षकांनी रक्तदान केले, त्यामध्ये राजेश बिसेन सर, प्रा.खुजे सर, प्रा. कोटकर मॅडम, प्रा. ठाकरे सर, प्रा.डे सर, प्रा. जोगी सर, प्रा. यादव सर, प्रा. जंजालावॉर मॅडम तसेच अनेक शिक्षकांचा रक्तदान केले.

ह्याप्रसंगी पी.एस. आंबटकर यांनी रक्तदानाचे महत्व सांगताना “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे” असे मार्गदर्शन व्यक्त केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत साईनाथ ब्लड सेंटर हॉस्पीटलचे डॉ. किशोर भांडेकर, शशांक कुइटे, विश्रांती कायारकर, प्रणाली राऊत, स्वीटी गायकवाड, अक्षय घरडे, ह्यांनी सहकार्य केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी मौलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये