सोमय्या ग्रुपच्या वतीने शिक्षक सम्राट पी एस. आंबटकर यांना जन्मदिवसांच्या दिल्या शुभेच्छा
कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते, संस्थापक पी. एस. आंबटकर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक P.S. एस.एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, संचालिका श्रीमती. अंकिता पियुष आंबटकर, श्रीमती. प्रांजली रघटाटे, डॉ.पायल आंबटकर, कुलसचिव बायसन सर तसेच प्राचार्य शोभना मॅडम, प्राचार्य फय्याज सर, प्राचार्य राजदा सिद्धकी, प्राचार्य जमीर शेख सर, प्राचार्य दिपक मस्के, प्राचार्य खुजे सर उपस्थित होते.सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून माँ सरस्वती व माँ भवानी यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्राचार्य आणि मान्यवरांनी त्यांचाबद्दल कौतुक करीत असताना आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्ननाचा बहर येऊ दे, इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे, दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेचा जन्म झाला, तसेच त्यांचे सुपुत्र उपाध्यक्ष पियुष आंबटकर आणि पत्नी अंकिता पियुष आंबटकर, कुटुंबाच्या सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असेलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे, या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विद्यार्थाना, चंद्रपूर जिल्ह्यातून दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत सर्व शिक्षकगण श्री, पी एस, आंबटकर यांच्या जन्मदिवसचा शुभेच्छा दिल्या.
तसेच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची आणि आपल्या कार्याप्रती समर्पणाची भावना असेल तर यश हे आपोआपच आपल्या जवळ चालत येते हा यशाचा मूलमंत्र पी. एस. आंबटकर यांनी जपत आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहे. त्याच्या या संस्कारांची शिदोरी घेऊनच आम्हीही आज आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत.
“Nothing is impossible का नारा लेकर Everything is possible ” असे म्हणणारे MSPM चे संस्थापक श्री. पांडुरंगजी आंबटकर हे शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होती.