गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय पोषन आहाराचा काळा बाजार करणारे रॅकेट, पोलीस स्टेशन सेवाग्राम, वर्धा पोलीस कडुन उघडकीस

एकुण कि. 8 लाख 69 हजार 810 रु.चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 29/11/2023 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम अंतर्गत MIDC सेवाग्राम येथुन आरोपी विनोद बबनराव भांगे, वय 40 वर्ष रा. वार्ड नं. 02 बोरगाव मेघे ता. जि. वर्धा याचे ताब्यातील टाटा मेगा कंपनीचा मालवाहू वाहन क्र. एमएच-29-एटी- 1102 च्या मागील डाल्यामध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाचे एफ.सी.आय.चे सिल लागलेले तांदुळांनी भरलेले 50 पोते एकुण वजन 25 क्विंटल, प्रति क्विंटल रु. 2,350/- प्रमाणे एकुण रु. 58,750/-, 2) एक जुना वापरता टाटा मेगा कंपनीचा मालवाहु वाहन क्र. एमएच-29-एटी-1102 अंदाजे कि. 1,50,000/- मिळुन आल्याने त्यास सदर माला बाबत विचारणा केली असता.,

सदर माल शालेय पोशन आहाराचा असल्याचे सांगितले व सदर माल कोठुन आनाल याची चौकशी केली असता किशोर नारायणराव तापडीया, वय 46 वर्श, रा. एस.टी. डेपोजवळ, रामनगर, ता. जि. वर्धा, याचे गोडावुन मधुन आणला असे सांगितले करित सदर गोडावुन व मालाची चौकशी करिता शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप यांना बोलावुन त्याचे सह गोडावुन ची पाहणी केली असता गोडावूनमध्ये मिळुन आलेला 3) प्रत्येकी 50 किलो वजनाचे एफ. सी. आय. चे सिल लागलेले तांदुळांनी भरलेले 490 पोते एकुण वजन 245 क्विंटल, प्रति क्विंटल रु. 2350/- प्रमाणे रु. 5,75,750/-, 4) “राज्य सरकारी विपणन संघ मर्यादीत FOOD GRAINS COMMODITY PADDY/RICE KMS-202223 APEX MARKFED BIRLA JUTE MANUFACTURED IN INDIA असे प्रिंट केलेले रिकामे 561 पोते. प्रति पोते रु. 10/- प्रमाणे रु. 5,610/-, 5) मटकीने भरलेले प्रत्येकी 25 किलो वजनाचे 12 चुंगडया एकुण वजन 3 क्विंटल प्रति क्विंटल रु. 7,000/- प्रमाणे रु. 21,000/-, 6) सर्वप्युअर कपंनीचे सोयाबीन खाद्य तेलाचे प्रत्येकी 1 लिटरचे 57 पॅकेट प्रति लिटर रु. 100/- प्रमाणे रु. 5,700/-, 7) Sayyam कंपनीची मिरची पावडरचे पॅकेटने भरलेल्या 24 चुंगडया प्रत्येक चुंगडीमध्ये 25 किलो व प्रति चुंगडी रु. 2,000/- प्रमाणे 48,000/-, 8) Sayyam कंपनीची हळद पावडरचे पॅकेटने भरलेल्या अडीच चुंगड्या प्रत्येक चुंगडीमध्ये 25 किलो प्रति चुंगडी रु. 2,000/- प्रमाणे रु. 5,000/- 9) धान्य उचल केल्याचे बिल पावत्या, मालाच्या देवाण-घेवाणचे रजिस्टर कि. रु. 00/- असा एकुण जु.कि. 8,69,810/- चा मुद्देमाल मिळुन आला.,

वरुन मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करून पो.स्टेला फिर्यादी श्री सचिन नागनाथ जगताप, वय 50 वर्श, व्यवसाय नोकरी (शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिशद, वर्धा) यांचे लेखी रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक 717/2023 कलम 379, 420, 468, 471, 34 भा.दं. वि. सहकलम 3, 7 जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 गुन्हा नोंदविण्यात आले. सदर गुन्ह्यात आता पावेतो 1) किषोर नारायणराव तापडीया, वय 46 वर्श, रा. एस.टी. डेपोजवळ, रामनगर, ता. जि. वर्धा, 2) विनोद बबनराव भांगे, वय 40 वर्ष रा. वार्ड नं. 02 बोरगाव मेघे ता. जि. वर्धा 3) शेख रहीम शेख करीम, वय 46 वर्श, रा. स्वास्तीक नगर, सावंगी (मेघे), वर्धा, 4) अंकित सतीष अग्रवाल, रा. मुर्तीजापुर, जि. अकोला यांचा समावेश असुन आणखी आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करित आहे.

सदर कार्यवाही वरून जिल्हयातील कारंजा तसेच हिंगणघाट येथिल गोडावुन सबंधीत विभागामार्फत सिल करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री प्रमोद मकेश्वर, ठाणेदार श्री. चंद्रशेखर चकाटे याचे मार्गदर्शकता पो.उप.नि राहुल इंटेकार, सफौ मारोती कातकर, पोहवा हरिदास काकड पोहवा मंगेश झामरे, सचिन सोनटक्के पोना गजानन कठाणे, संजय लाडे, पोशि अभय इंगळे, पवन झाडे चालक पोहवा विलास लोहकरे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये