Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुल्या वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपूरचा प्रलय ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

चांदा ब्लास्ट

संविधान संवर्धन समिती, भद्रावती द्वारा यांच्या तर्फे भारतीय संविधान दिनानििमीत्ताने आंबेडकर चौक भद्रावती येथे भव्य खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजंन करण्यात आले होते.

भारतीय संविधान आणि आजची राजकीय परिस्थिती हा स्पर्धेचा विषय होता ज्यात जवळपास चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, त्यात सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर येथे पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या प्रलय शाम म्हशाखेत्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला येथील तर द्वितीय पारितोषिक संविधान अवथाडे तर तृतीय पारितोषिक प्रेम नामदेव जरपोतवार यांनी पटकाविला.

मुख्य प्रबोधनाच्या कार्यक्रमात बक्षिस वितरण सोहळा पार पडला ज्यात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते तुषार उमाळे यांच्या हस्ते पारितषिक वितरण करण्यात आले.

प्रलयने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक,आई वडील,व मित्रपरिवाराला दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये