ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलधारकांना मिळणार मोफत रेती

५ मे पासून होणार घाटावर वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली – शासनाने घरकुल मंजूर केले परंतु बांधकासाठी लागणारी रेती मात्र शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे मिळत नसल्याने घरकुलांची कामे ठप्प पडली आहेत यामुळे शासनाप्रती जनतेमध्ये आक्रोश आहे. ही परिस्थिती पाहता सावली तालुका प्रशासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना ५ मे पासून रेती रेती वाटपाचे नियोजन करण्यात आले असून रेती वाटपाबाबतचे आदेश तलाठी यांना दिलेले आहे.

       तालुक्यात प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण आवास, रमाई आवास योजनेनंतर्गत हजारो घरकुल मिळाले, पण रेतीचे काय असा प्रश्न अनेक घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

रेतीच्या टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही तर काहींनी अधिकच्या भावाने चोरीची रेती खरेदी करून बांधकाम सुरु केले मात्र तेही अर्धवट आहेत. घरकूल लाभार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन लाभार्थी, लोकप्रतिनिधी व वृतपत्राच्या माध्यमातून रेतीची मागणी केली जात होती. शासनाने जुने धोरण बदलवत २०२४ मध्ये नवीन रेती धोरण जाहीर केले. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेती देण्यात येणार आहे.

किती ब्रास देण्यात येणार आहे हे स्पष्ट नसले तरी सावली तालुका प्रशासनाने रेती वाटपाचे नियोजन केले असून तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी तसे आदेश तलाठी यांना स्वतः रेती घाटावर उपस्थित राहून वाटप करण्याचे आदेश दिलेले आहे. यामुळे घरकुल बांधकामाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याचे चित्र दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये