ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकु हल्लात एक गंभीर जखमी

मूल तालुक्यातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

मूल : जुन्या वादातुन एका 19 वर्षीय मुलावर चाकु हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे गुरूवारी रात्रौ 8.30 वाजता दरम्यान घडली. सुजल विनोद बुबडे वय 19 वर्षे रा. गडीसुर्ला असे गंभीर जखमी मुलाचे नांव आहे तर भुषण राजु चचाणे वय 19 वर्षे, गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे रा. मूल असे आरोपीचे नांव आहे.

पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील सुजल विनोद बुबडे रा. गडीसुर्ला हा मूल येथे आपल्या आजीकडे राहुन शिक्षण घेत होता, दरम्यान गुरूवारी तो गडीसुर्ला येथे गेला होता, रात्रौ 8.30 वाजता दरम्यान तो गावातील पाण्याच्या टाकीजवळ असताना मूल येथील भुषण राजु चचाणे वय 19, गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे यांनी त्यांच्यावर धारदार चाकुने पाठीवर आणि पोटावर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी सुजल बुबडे यांला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मूल पोलीस घटनास्थळावर पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींना अटक केली आहे.

आरोपींवर भांदवी कलम 307 (34) अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकाअर्जुन इंगडे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये