ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आय.पी.एल. ट्रॉफी २०२५ चे क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेळणाऱ्या बुकींवर कारवाई

आरोपीचे ताब्यातुन एकुण २ लाख ५२ हजारावर मुद्देमाल जप्त.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ३०/०५/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ने पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्‌दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, चौधरी वार्ड हिंगणघाट येथे राहणारा – तुळशीदास गिरधारीलाल पाखराणी, वय ४४ वर्षे, रा. चौधरीवार्ड, विसीसी ग्राउंड जवळ, हिंगणघाट जि. वर्धा हा त्याचे राहते घरुन त्याचे जवळ असलेल्या वेगवेगळ्या मोबाईल फोनचे माध्यमातून ग्राहकांसोबत संपर्क करुन सद्या सुरु असलेल्या इंडीअन प्रिमीअर लीग २०२५ से चंदीगढ़ येथे सुरु असलेल्या मुंबई इंडीयन्स विरुध्द गुजरात टायटन्स या लाईव्ह क्रिकेट मैचवर स्वतःचे आर्थीक फायदया करीता पैश्याचा हारजीतचा जुगार खेळ खेळत आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा ने प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण त्यांचे वर स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत जुगार कायदयाअन्वये जुगार रेड केला असता सदर ठिकाणी आरोपी कमांक १) तुळशीदास गिरधारीलाल पाखराणी, वय ४४ वर्षे, रा. चौधरीवार्ड, विसीसी ग्राउंड जवळ, हिंगणघाट जि. वर्धा हा मिळुन आला त्याचे ताब्यातुन दोन वेगवेगळ्या कंम्पनीचे अॅन्ड्राईड मोबाईल किंमत १,२०,०००/-रु, २) एक सोनी कंम्पनीचा अॅन्ड्राईड टिव्ही किंमत ५०,०००/-रु, ३) एक टिव्ही रिमोट किंमत १००/-रु, ४) एक मोबाईल बार्जर किंमत ५००/-रु. ५) नगदी रोख ७७,०२०/-रु, व आरोपीचे घरदाइतीत ६) एक खद्दर्याचे खोक्यात टुबर्ग कंम्पनीच्या ६५० एम.एल.च्या काचेच्या सिलबंद ८ बिअर किंमत २,४००/-रु, (७) दुबर्ग कंम्पनीची ५०० एम.एल.चे टिनाचे सिलबंद १ कॅन किंमत ३००/-रु. ८) एक सिंगनेचर कंम्पनीचा ७५० एम.एल.या विदेशी दारुने भरलेला सिलबंद बंफर किंमत २,०००/-रु, असा एकूण जु. किंमत २,५२,३२०/-रु चा मु‌द्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला.

यातील आरोपी कमांक १ यास सदर आय.पी. एल. जुगाराबाबत अधिक विचारपुस केले असता तो त्याने क्षमते पेक्षा मोठे रक्कमेसा जुगाराचे आकडे हे त्याचा साथीदार आरोपी नामे २) राकेश वारसागडे, ३) नितीन चमेडीया, दोन्ही रा. पांढरकवडा (केळापूर) जि. यवतमाळ यांचे कडे देत असल्याचे सांगीतल्याने तिन्ही आरोपीतांन विरुध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे कलम ४. ५ महाराष्ट्र जुगार कायता सह कलम ६५ई, ७७अ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी. बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भुषण निघोट, मनिष कांबळे, रितेश शर्मा, अमोल नगराळे, गोपाल बावणकर, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, महीला अमलदार लेखा राठोड, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये