Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्यात बैल ठार

वनविभागाने याकडे दुर्लक्ष .-- नागरिकात भितीचे वातावरण

चांदा ब्लास्ट —————————————————-
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)

सावली येथुन ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिबगाव येथे रात्रो बुधाजी तुळशीराम शेंडे यांच्या घराला लागुन असलेल्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश करत वासरु ठार करून शेतीशिवारात नेउन ठेवले जिबगाव परिसरात दोन तिन महीण्याचे अगोदर सुध्दा घटना घडली असून वनविभागाने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे जिबगाव येथे भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने मोठा प्रकरण घडल्यानंतर वनविभागाने याकडे लक्ष देतील का?असा सुध्दा प्रश्न जिबगाव वासीय जनतेला पडत आहे सावली तालुका हा वाघाच्या भितीने आधिच भयभित झालेला असुन पुन्हा वारंवार सावली तालुक्यात घटना घडत आहेत याकडे वनविभागाने याकडे लक्ष देउन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच पुरुषोत्तम चुदरी व ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये