प्राचार्य ठावरी सर व मित्रपरिवार द्वारा दिपाली पहाटचे कोरपणा येथे कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – दिवाळीच्या शुभ पर्वावर दिवाळी पहाट हा सुमधुर भक्ति गीत, भावगीतांचा बहारदार कार्यक्रम हनुमान मंदिर जिल्हा परिषद शाळेसमोर कोरपना येथे पार पडला.
स्वरपुष्प म्यूजिकल इवेंट्स प्रस्तुत श्रीकांत आसुटकर व संच मित्र परिवार यांनी सदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे संचालक विजयराव बावने, राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश सचिव सैय्यद आबीद अली, कोरपना पंचायत समितिचे माजी सभापती श्याम रणदिवे, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान बांध काम सभापति मनोहर चन्ने, एडवोकेट श्रीनिवास मुसळे डॉ. अरुण ठाकरे प्राध्यापक विशाल मालेकर, अल्काताई रणदीवे, जिल्हा बँकेचे सेवानिवृत व्यवस्थापक अनिल रेगुंडवार ओम शिवाई जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष उत्तमराव मोहितकर,प्राचार्य संजय ठावरी, सेवानिवृत्त शिक्षक संजीव चांदूरकर, प्रदीप नागोसे, शेषराव मन्ने,अजय राठोड,दिनकर सोनटक्के पुंडलीक गिरसावळे, शांताराम देरकर, सुधाकर मोहितकर,सत्यवान घोटेकर,दिलीप जेनेकर, किशोर पाटील,ऋषि जोगी, गुरुदेव सेवा मंडलचे मिंनाथ महाराज पेटकर तुलशीराम पारखी, मंगलाताई पारखी, छाया जेनेकर, सुहास गोडे ओमेश्वरी ढोके, दादाजी तुराणकर मारोती धगडी, विलास देवाळकर, संजय काळे, अविनाश आगलावे, पिंपलशेंडे आदीसह मोठ्या संख्येने कोरपनाकराची उपस्थित होती.
सुमधूर गीतानी श्रोते मंत्रमुग्ध झाले, उपस्थितांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. फटाक्यांची आतिशबाजी व मीठाई वाटप करण्यात आली, या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य संजय ठावरी सर आणि मित्र परिवार यानी केले होते, केजीएन साउन्डचे साहिल यांनी उत्तम ध्वनि योजना केली. होती.कार्यक्रम प्रसंगी सर्व उपस्थितांचे आभार उमेश पालीवाल यानी मानले