ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त अमृत महा आवस योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पंचायत समिती जिवती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग च्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

           जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कृत लाभार्थी म्हणून प्रथम क्रमांक भोक्सापुर येथील जनाबाई निवृत्ती सलगर, द्वितीय पुरस्कार पुडियाल मोहदा येथील हरिश्चंद्र शंकर जाधव, तृतीय क्रमांक आंबेझरी येथील यशवंत गोविंदराव मडावी, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कृत लाभार्थी प्रथम क्रमांक कोदेपुर येथील शेकु बापूराव धूर्वे, द्वितीय क्रमांक लांबोरी येथील मोतीराम पगु कुमरे, तृतीय क्रमांक जैतुबाई चिनु आत्राम, सर्वो्कृष्ट केंद्र पुरस्कृत ग्राम पंचायत प्रथम क्रमांक ग्राम पंचायत पुडीयाल मोहदा द्वितीय क्रमांक ग्राम पंचायत शेगाव तृतीय क्रमांक ग्राम पंचायत खडकी हिरापुर, सर्वो्कृष्ट राज्य पुरस्कृत ग्राम पंचायत प्रथम क्रमांक ग्राम पंचायत नंदप्पा द्वितीय क्रमांक ग्राम पंचायत येरमी येसापुर तृतीय क्रमांक ग्राम पंचायत केकेझरी सर्वो्कृष्ट केंद्र पुरस्कृत क्लस्टर प्रथम क्रमांक ग्राम पंचायत पाटण ग्राम पंचायत शेनगाव यांना देण्यात आले.

        या प्रसंगी डॉ. भागवत रेजिवाड गटविकास अधिकारी पं. स. जिवती, अविनाश शेंबटवाड तहसीलदार, शुभांगी गावडे तालुका कृषी अधिकारी, अंकुश गोतावळे उप नगराध्यक्ष, गणपत आडे काँग्रेस तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई मुसने, गिरमाजी सरपंच, सीताराम मडावी, वामन पवार, ताज्जुदिंन शेख यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये