ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिचोली ग्रामपंचायतच्या निवडणुकीत संगीता दोडके विजयी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत च्या केवळ एका जागेचा निकाल दिनांक सहा रोज सोमवारला तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीत संगीता विनोद दोडके या विजयी झाल्या आहेत.

त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार लता जनार्दन जांभूळे यांचा 23 मतांनी पराभव केला आहे. संगीता दोडके यांना 72 तर लता जांभुळे यांना 49 मते मिळालीत तर नोटाला सात मते पडली.

या निवडणुकीत 128 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश पारखी यांनी तर सहाय्यक म्हणून घोरपडे यांनी काम पाहिले. निवडणुकीत विजय झाल्याबद्दल गावात संगीता दोडके यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये