Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरचे आयोजन

40 नागरिकांनी राक्तदान तर 97 नागरिकांनी केली नेत्र तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 08/01/2025 रोजी 36 वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी सुमारे 40 नागरिकांनी राक्तदान केले व 97 नागरिकांनी नेत्र तपासणी चा लाभ घेतला.

सामान्य नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच रस्ता रस्त्यावरील अपघातांचे प्रकार याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी स्नेहा राजू मेढे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा मेघल अनासने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रतापसिंह राठोड विभाग नियंत्रक म रा मा प का वर्धा डॉ शिवली कलोडे बि टी ओ जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा श्री देवानंद पाटील पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग वर्धा डॉ प्रीती परळकर जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक वर्धा तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक प्रफुल मेश्राम, संदीप मुखे, अजय चौधरी, साधना कावळे व सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, अक्षय मालवे, आदित्य ठोक, अमर पखान, राहुल ढोबळे व कर्मचारी वर्ग आणि वर्धा जिल्हातील सर्व ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये