ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय चा तृतीय वर्धापन दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय ,कृष्णप्रिया गोशाळा – सिद्धान्तसार ग्रंथालयाचा

*तृतीय वर्धापनदिन समारंभ*नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

परमपूज्य श्री.मोहननाथमहाराज पैठणकर यांच्या पावन सानिध्यात मा.आमदार श्री.वसंतजी खंडेलवाल, आमदार श्री.मनोज कायंदे, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, श्री.संदीप माहोरकर, .डॉ गणेश मांटे व इतर मान्यवर तथा भाविक सज्जनांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

उद्बोध महाराज पैठणकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय, गोशाळा व ग्रंथालयाच्या प्रगती चा आढावा सादर केला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.

उपस्थित अतिथिनी विद्यालयाचे कौतुक केले,

कार्यक्रमांचे सूत्र संचालन श्रावण गुरूजी फडे, संभाजीनगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उदबोध महाराज पैठणकर यांनी केले, कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये