ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र दोन दिवस (आज) (उद्या) ग्राहकांच्या सोईसाठी कार्यालयीन वेळेत सुरु

थकबाकीदार वीज वीज ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून  सहकार्य करावे - महावितरण

चांदा ब्लास्ट

चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र २८ तथा २९ ऑक्टोबर ०२३ रोजी ग्राहकांच्या सोईसाठी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

   वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण कडून ऑनलाईन वीज देयकाची भरणा करण्याची सुविधा दिली असून महावितरण ‘मोबाईल एप’चा वापर करून वीज ग्राहक आपल्या देयकाची रक्कम भरू शकतात. लघुदाब वर्गवारीतीलसर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in   वेबसाईट, मोबाईल एप  किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. ऑनलाईन वीज देयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईल आणि सोबतच ०.२५ टक्के डिजिटल पेमेंट भरणा सूट देखील मिळेल. थकबाकीदार वीज वीज ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून  सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहेwww.mahadiscom.in

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये