ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा तथा भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी संदीप कोणतमवार यांची निवड

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण, सुरक्षा तथा भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी चंद्रपूर येथील संदीप दत्तात्रय कोणतमवार यांची निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्ती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बालृ सिंह झाला यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

याआधी कोणतमवार यांच्यावर चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याचा कार्यभार देण्यात आला होता मात्र त्यांचे कार्य लक्षात घेता संघटनेतर्फे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.

या पदावर कार्यरत राहून ते संघटनेचे कार्य संपूर्ण राज्यात वाढवेल असा विश्वास वरिष्ठांकडून व्यक्त केल्या गेला आहे त्यांच्या निवडीबद्दल आमदार बंटी भागडीया, अतुल गण्या पवार,विजय मालवी, मनोज बिट्टूवार, महेश भूपती प्रमोद वंजारी, सुनील बिपटे, रमेश खरपकर आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये