ताज्या घडामोडी

घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न – रोटरी क्लब ने केले होते स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

रोटरी क्लब राजुराच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संकट मोचन हनुमान मंदिर येथे थाटात संपन्न झाला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. एक ते तीन दिवसाचा गणपती, पाच दिवसाचा गणपती, आणि दहा दिवसाचा गणपती यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षिसे देण्यात आली.

एक ते तीन दिवसाच्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती गादेवार, द्वितीय पूनम साईनवार, तृतीय सार्थक साईनवार, पाच दिवसाच्या गणपती स्पर्धेत प्रथम गणेश नवलकर, द्वितीय अजित सातपुते, तृतीय निलेश गंपावार, दहा दिवसाच्या गणपती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम श्याम झंवर, द्वितीय प्रियांशू मंगरूळकर, तृतीय दीपेश नावंधर यांची निवड झाली.

बक्षीस वितरण समारंभाला रोटरी क्लबचे राजुराचे अध्यक्ष कमल बजाज, सचिव सारंग गिरसावळे, कोषाध्यक्ष निखिल चांडक, माजी अध्यक्ष नवल झंवर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती जावरे, स्वरूपा झंवर तसेच सदस्य आनंद चांडक, सुबोध डाहुले, किरण ढुमणे, अजहर शेख, मयूर बोनगीरवार, अपर्णा बजाज, प्रणाली खनके, भारती कोंडावार व स्पर्धेत सहभागी झालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुनम गिरसावळे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये