Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तनिष्का देवगडे राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी पात्र

चंद्रपूरातील एकमेव विद्यार्थीनी आहे हे उल्लेखनीय

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यातील क्रीडा युवक सेवा संचालनालय यांच्या माध्यमातून बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चंद्रपूर शहरातील चांदा पब्लिक स्कूलची इयत्ता १० वी ची विद्यार्थीनी कु. तनिष्का देवगडे हिने अनेक शाळांना मागे टाकत राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेत विविध जिल्हयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता, त्यात चंद्रपूरातील ही एकमेव विद्यार्थीनी आहे हे येथे उल्लेखनीय.

तनिष्काच्या या क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या यशाने शाळेचे नाव उंचावले आहे. बौद्धीक क्षमतेवर आधारीत असलेल्या अशा विविध क्रीडांचे शाळा नेहमीच आयोजन करीत असते अशी प्रतिक्रीया शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी देत शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी तनिष्काचे कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये