अनिकेत परसावार यांच्या फिल्म थिएटर कार्यशाळेत शंभर विद्यार्थ्यांच्या सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
आज कालच्या युवकामध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसं होता येईल, येथे काम कसं मिळते? कोणाला किती मानधन असते? या क्षेत्रातील शिक्षण कुठे मिळतं? याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
अपूर्ण मार्गदर्शनामुळे कित्येक युवा कलाकारांची दिशाभूल होते. युवा कलाकारांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचं भविष्य कला क्षेत्रात घडावं म्हणून महात्मा गांधी विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर, व्यंकटेश चिटफंड प्रा. लि. गडचांदूर व कॅलीबर फाऊंडेशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन दिवसीय फिल्म थिएटर कार्यशाळा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आयोजित करण्यात आली.
युवा दिग्दर्शक तसेच लेखक व कवी अनिकेत परसावार याच्या उपस्थितीत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे, श्री. वेंकटेश बलसानीवार व प्राध्यापक आशिष देरकर यांनी केले. या कार्यशाळेमध्ये दिग्दर्शक अनिकेत परसावार यानी चित्रपट व नाटक लिखाण, कॅरेक्टर ऑब्झर्वेशन, ऑडिशन कसे द्यायचे, अभिनय कसा करायचा, अभिनयाचे ९ रस, गोंडी संस्कृती, न्यू इंडियन सिनेमा, नाट्य शास्त्र याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली.
या कार्यशाळेमध्ये एकुण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिग्दर्शक अनिकेत परसावार सध्या त्यांच्या आगामी चित्रपट डफ वर काम करीत आहे. चित्रपटाची कथा विदर्भीय लोकांच्या जीवनावर आधारित आहे. सोबतच याचं वर्षी त्यांनी लिहलेला ‘ख़्वाबों के कमरे में’ हा हिन्दी-उर्दू भाषेचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. हा काव्यसंग्रह अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे. शहर व ग्रामीण भागातील मुलांना कलेचा इतिहास व मार्गदर्शन मिळण्यासाठी मी अशी कार्यशाळा नेहमी घेत राहीन आणि कलेची सेवा करत राहीन. असे दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले.