ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी चांदा येथे अलंकार सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

येथील केंद्रीय विद्यालय आयुध निर्मानी चांदा मध्ये नुकताच सकाळच्या प्रार्थना सभेमध्ये विद्यालयातील 36 सदस्यीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजना मध्ये सर्व सदस्यांना बॅच देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

विद्यालयातील मुलींची प्रमुख म्हणून कुमारी आरोही शुक्ला तर मुलांचा प्रमुख म्हणून सुधांशू गुप्ता यांची निवड करण्यात आली.

यावेळी सदन प्रमुखांनकडुन सदनच्या प्रमुखाला ध्वज प्रदान करण्यात आला. प्रामुख्याने क्रीडा प्रमुख, उप प्रमुख व शाळा प्रमुख यांना बॅच देवून गौरविण्यात आले. सर्व सदन सदस्यांनी शपथ ग्रहण केली. या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य स्वाती विश्वकर्मा यांनी अध्यक्षीय भाषण दिले.

यावेळी विद्यालयातील विद्यालयातील शिक्षक – शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाअंती राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये