ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बौद्ध लेणीस इतिहास विद्यार्थ्यांची भेट

अभ्यास दौऱ्यात इतिहास विषयाचे २७ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                 स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शहरातील विंजासन बुध्दलेणीस भेट दिली .सदर अभ्यास दौऱ्यात इतिहास विषयाचे २७ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. इतिहास विभागप्रमुख डॉ.जयवंत काकडे, मराठी विभागप्रमुख, डॉ. रमेश पारेलवार व इंग्रजी विभागातील प्रा. अमीत बांबोडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी टेकडी परीसराचे निरिक्षण व अध्ययन केले.

या भेटीनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ काकडे यांनी सांगितले की,” प्राचीन भारताच्या इतिहासाचे साधन म्हणून भौतिक साधनांना अत्यंत महत्त्व आहे. त्या साधनांची उपलब्धता भद्रावती व भद्रावती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना इतिहासाचे लेखन व इतिहास समजण्यासाठी म्हणून भद्रावती लगतच्या विजासन येथील बौद्ध लेणीला क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. विजासन येथील बौद्ध लेणी ही विदर्भातील लेण्यांमध्ये आकाराने सर्वात मोठी लेणी आहे असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये