ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ फार्मसी महाविद्याल,देऊळगाव राजा येथे फार्म वीकचे आयोजन

75 रक्तदात्यांनी केले रक्तदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     फॉर्मसिस्ट स्ट्रेनथनिंग इन हेल्थ सिस्टीम या थीम अंतर्गत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी देऊळगाव राजा येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . या निमित्ताने महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर, मॉडेल प्रेझेन्टेशन, रक्त गट तपासणी, विज्ञान प्रदर्शन, फर्मासितील विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक आशा अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालया मधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरारामध्ये जालना येथील जालना ब्लड बँकेने रक्त संकलनाचे काम केले.

महाविद्यालयातील तब्बल 75 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. तसेच जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून शहरातील अकरावी व बारावी जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले. व महाविद्यालयाच्या डी फार्म, बी फार्म या विद्यार्थ्यांमार्फत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रदर्शनीमध्ये फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ह्युमन ॲनाटोमी तसेच फार्मासुटिक्स,फार्मास्युटिकल केमिस्त्री, फार्माकोग्नोसी या विषयांचे मॉडेल तयार करून, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी या अभ्यासक्रमा संदर्भात माहिती व त्याची ओढ निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये शरीर रचनेचे विविध मॉडेल त्यांची कार्यप्रणाली याची विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली. तसेच महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेले विविध उपकरणांची ओळख करून देण्यात आली, त्याचे कार्य, उपयोग संदर्भात माहिती देण्यात आली. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट मॉडल पुरस्कार देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. फार्मसी दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी अविनाश चौधरी, डायरेक्टर ऑफ ऑक्सी लाईफ लॅबोरेटरी, संभाजीनगर यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी फार्मसिस्टचे समाजाप्रति कर्तव्य समजावून सांगितले. तसेच फार्मसी क्षेत्रात उपलब्ध संधीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एक आदर्श फार्मसिस्ट म्हणून प्रत्येकाने आपल्या सामाजिक कर्तव्याची जाण ठेवावी असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री देवानंद भाऊ कायंदे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल ताठे सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाची रूपरेषा ठेवून कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल ताठे सर यांनी प्रस्ताविकतेमध्ये फार्मासिस्ट हा हेल्थ सिस्टमचा एक अविभाज्य घटक आहे असं संबोधन केले. व फार्मासिस्टने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले. फार्मसीस्ट चे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाचे फार्मा काॅगनसी या विषयाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉ. गोपालकृष्ण सीताफळे सर यांनी थोडक्यात व अतिशय महत्त्वाची फार्मासिस्ट दिवसाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्याचप्रमाणे फार्मासिस्टचे रोल आणि त्यांच्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे फार्मासुटिक्स च्या विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक किशोर चराटे सर यांनी केले, व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फार्मासुटिकल केमिस्ट्री या विषयाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तमजी लड्डा सर यांनी केले.

तसेच फार्मासिस्ट दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे, सचिव सौ. नंदाताई कायंदे, सहसचिव मनोज भाऊ कायंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेमध्ये असे अनेक मार्गदर्शनपर उपक्रम सतत राबविण्यात येत असतात. हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सर्वांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये