ताज्या घडामोडी

तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत घुग्गुसच्या माऊंट कार्मेल शाळेचा दबदबा

सुवर्ण, रजत व कांस्य पदकांची विद्यार्थ्यांनी केली लयलूट

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

एस जी एफ आय म्हणजेच स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे सर्वच तालुक्यांत शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असून ह्या स्पर्धेत घुग्गुस येथिल माऊंट कार्मेल कॉन्वेंट सीनियर सेकंडरी स्कूल सीमेंटनगर ह्या शाळेने विविध क्रीड़ा प्रकारात सुवर्ण , रजत तसेच कांस्य पदकांची लयलूट करून चंद्रपूर तालुक्यात दबदबा निर्माण केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ह्या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटाच्या भालाफेक स्पर्धेत शाळेच्या प्रीतम अम्बाला ने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तर रिले रेस प्रकारात हर्षल लोनगाडगे, इशांत दुर्गे, सोहम डाखरे व हर्षल बोबडे ह्यांच्या चमुने सुवर्ण पटकावले. ह्याच वयोगटातील

400 मीटर धावण्याच्या शर्यतीत हर्षल बोबडे ने सर्वाधिक जलद पळुन सुवर्ण पदक खेचुन आणले तर हर्षल लोनगाडगे तिसऱ्या क्रमांकावर आल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या ह्याच क्रीडा प्रकारात तनुश्री वडस्कर कांस्य पदकाची मानकरी ठरली. 200 मीटर स्पर्धेत सोहम डाखरे कांस्य पदकासह तिसऱ्या स्थानावर थांबला. 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आरोही घिवे हिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर मुलांच्या स्पर्धेत तेजस झाडे निसटत्या फरकाने कांस्य पदकावर स्थिरावला तर 100 मीटर स्पर्धेत प्रज्योत जुनगरी कांस्य पदकाच्या पुढे मजल मारण्यात अपयशी ठरला.

14 वर्ष वयोगटाच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत उन्नती किरण बांदुरकर हिने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. 800 मीटर स्पर्धेत कृष्णा सचिन चिन्नावारने रजत पदकावर स्पर्धा संपविली तर 200 मीटर स्पर्धेत दृष्टि तुळशीदास ढवस कांस्य पदकासह तिसऱ्या स्थानी आली.

सर्व विद्यार्थ्यानी तालुका स्तरीय स्पर्धेतील यशाचे श्रेय शाळेतील क्रीड़ा शिक्षक श्रीदत्ता सर,  रोशनी मॅडम, ह्यांचेसह शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लीना, सर्व शिक्षकवृंद आणि आपल्या आई वडिलांना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये