ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारशहा येथून तिन अट्टल गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांनी केले तडीपार

चांदा ब्लास्ट

सध्या सुरू असलेले गणेशोत्सव व आगामी काळात येणारे ईद तसेच नवरात्र हे सण जनतेने शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे करण्याकरीता पो.स्टे. बल्लारशा परिसरातील अट्टल गुन्हेगार 1) चेतन मनोहर खुटेमाटे वय 43 वर्षे रा. बामणी 2 ) राकेश लक्ष्मण देरकर वय 32वर्षे रा.बामणी 3) किशोर गुलाब मुडपल्लीवार वय 52 वर्षे रा. बामणी या ईसमांवर गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आणि ते टोळीने गुन्हे करून दहशत माजवतात म्हणून पो. नि. उमेश पाटील, प्रभारी पो.स्टे. बल्लारशा यांनी हद्दपार करण्या बाबत पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला त्या प्रस्तावावर श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी कलम 55 अन्वये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे म्हणून चंद्रपूर जिल्हयातून 1 वर्षा करीता हद्दपार (तडीपार) केले आहे. या काळात सदर हद्दपार ईसम हे चंद्रपूर जिल्हयात कुठेही वास्तव्य करणार नाही.

यापुढे ही अशा प्रकारे गंभीर गुन्हे व दहशत माजविणारे गुंड यांचेवर गंभीर प्रतिबंधक कारवाई चंद्रपूर पोलीस दला मार्फत करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये