ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तहसील कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन

ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा मागणीची संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात पडलेली असून जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाज शामील करावे अशी मागणी केलली आहे, जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याचा मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये तसेच सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा असे अनेक मागण्या लक्ष वेध्नाकरिता त्या पूर्ण करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे व विजयराव बलकी प्रेमानंद जोगी चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्याला समोर अन्नत्याग करीत असून दिनांक 22/ 9/ 2023 च्या ओबीसी समाजाच्या झालेल्या बैठकीत त्यांचा समर्थनार्थ दिनांक 23 सप्टेंबर ला चक्काजाम आंदोलन 24 सप्टेंबर ला आंदोलन ठिकाणी पासून मा पालकमंत्री केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व चंद्रपूर विधानसभा सभेचे आमदार यांच्या घरापर्यंत तिरडी यात्रा 25 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एक दिवसीय लक्षणीय आंदोलन आणि 30 सप्टेंबर 2023 ला जिल्हा बंद आंदोलन पुकारले आहे वरील ओबीसीच्या न्याय मागण्या त्वरित पूर्ण करावे.

अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात अधिक त्रिव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना सीडीसी बँकेचे संचालक विजयराव बावणे,हरिदास गौरकार, प्रभाकर गेडाम, एस एम ठावरी, प्रकाश खनके , शामराव मुक्के,एस व्ही बावणे, अतुल आसेकर, शिवराम आदे, सुरेंद्र आडते, अनिल कवरासे, गणेश गोंडे, संभाजी कोवे, पांडुरंग जरीले, गणपत गोंडे, भारत चन्रे, संजय गौरकार, मनोहर चन्रे, तसेच सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये