ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने ७ बालकांना विषबाधा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने ७ बालकांना विषबाधा झाल्याची घटना लांबोरी येथे घडली.
विषबाधा झालेल्या बालकांची नावे विष्णू सिडाम (४),अद्वैत मडावी(३),नंदिनी कोडापे(५)कृष्णा सिडाम(२)नागोराव कोडापे (१०),समिबाई कोडापे(४)मनीषा कोडापे(४)याप्रमाणे आहेत
विषबाधा झालेल्या सर्व बालकांना सर्वप्रथम शासकीय रुग्णालय, जिवती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले,त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांनी दिली आहे.