ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्हेरनवरगाव येथील जुगार अड्ड्यावर चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हेशाखेची धाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथे मागील कित्येक दिवसांपासून 52 पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी गुन्हेशाखेच्या पथकाने धाड टाकली असता काही व्यक्ती जुगार खेळतांना आढळून आले.

त्यातील नामे 1)शानु शेख अब्दुल वाहब (37)रा.ब्रम्हपुरी व 2)अशोक सुखदेव ढोरे(43)रा.अर्हेरनवरगाव या दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळाले मात्र इतर काही व्यक्ती पसार झाले असल्याने अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तीची कसून चौकशी केली असता त्यांनी 1)नंदू भाणारकर रा.ब्रम्हपुरी 2)नितीन जरते रा.अर्हेरनवरगाव 3)धम्मादीप कऱ्हाडे रा.अर्हेरनवरगाव या तीन व्यक्तींची नावे सांगितली आहेत.सदर तिन्ही व्यक्तींचा शोध सुरू असून वरील पाचही आरोपींवर जुगार कायदा 2012 अंतर्गत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हेशाखा चंद्रपूर चे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये