ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोंढा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील कोंढा गावात तान्हा पोळा सन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.तान्हा पोळा हा बाल गोपालाचा आनंदाचा सन असतो. यामध्ये गावातील एकुण 187 बालगोपालानी पर्यावरण संवर्धन,शेती काळाची गरज,इंटरनेटचे फायदे व तोटे,कौटुंबिक हिंसाचार, मद्यपानामुळे कुटुंबाची होणारी दुर्दशा,गावाचा विकास या विषयावर आकर्षक देखाव्यासह सहभाग घेतला.

सर्व स्पर्धकातून लकी ड्रा च्या माध्यमातून हिमांशू मंगाम ची निवड करुन टि.व्ही. भेट देण्यात आली.नंदी बैल सजावटी चे प्रथम क्रमांक वेदांत मत्ते ,द्वितीय क्रमांंक शर्विल मोरे,तृतीय क्रमांक ज्ञाना ठेंगे,चतुर्थ क्रमांक विष्णू गोंडे ,पाचवा क्रमांक वंशिका वरारकर,सहावा क्रमांक सौम्या मांडवकर,सातवा क्रमांक अथांग राघमवार,आठवा क्रमांक ऋषभ नागपुरे,नववा क्रमांक प्रिया डोंगे,दहावा क्रमांक तनु ढेंगळे,अकरावा क्रमांक वेदांत राजूरकर,बारावा क्रमांक हार्दिक गौरकर, तेरावा क्रमांक आस्तिक मत्ते, चौदावा क्रमांक हर्ष मत्ते, पंधरावा क्रमांक प्रियांश ताठे यांची निवड करण्यात आली.

बक्षीस स्वरूपात नंदीबैल, सायकल, टेबल, मिक्सर, कुकर देण्यात आले. तसेच स्वर्गीय मधुकर मोरे व सिंधूताई मोरे यांच्या स्मृती प्रितर्थ्य भारत मोरे कडून निवड झालेल्या स्पर्धकांना शिल्ड देण्यात आले. सहभागी सर्व बालगोपालाना विजय ढेंगळे, प्रदीप मांडवकर, अविनाश गोंडे साई सर्व्हिसेस कोंढा यांचेकडून प्रत्येकाला तीन नोटबुक वितरित करण्यात आले.नंदी बैल स्पर्धेचे सजावट परिक्षण श्री.सुधाकर बत्की सर,श्री.राकेश मत्ते, श्री. सुनिल देठे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन महेश मोरे सरपंच तर आभार गणेश उपरे यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच महेश मोरे,उपसरपंच मंगेश मंगाम,भारत मोरे,अजय मत्ते,महेश मत्ते,अमोल देठे,नितीन गौरकर,राजू मत्ते,प्रकाश चिकटे,राजू ढेंगळे,प्रशांत चिकटे,राजू डोंगे,अतुल मत्ते,सुमित मत्ते,नितीन डोंगे,विजय मत्ते,विजय ठेंगे,प्रवीण मंगाम,संदीप कालर, नारायण डोंगे, अशोक मत्ते तसेच गुरुदेव सेवा मंडळ,मराठा वरियर्स मंडळ,जगन्नाथ मंडळ,न्यू जगन्नाथ मंडळ तसेच समस्त गावकरी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये