ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव क्रीडा स्पर्धेत विध्यार्थाना मनपा स्तरीय प्रथम क्रमांक

चांदा ब्लास्ट

जिल्हा स्टेडियम येथे आयोजित केलेल्या मनपा स्तरीय / जिल्हा स्तरीय शालेय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, वॉलीबॉल स्पर्धा, कॅरम स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, घेऊन घेण्यात आले, मॅकरून स्टुडन्ट अॅकॅडमीच्या विध्यार्थानी अव्वल क्रमांक घेऊन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

त्यामध्ये मॅकरून स्टुडन्ट अॅकॅडमीच्या विध्यार्थाना मनपा स्तरीय वॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन, दरवर्षी प्रमाणे यंदाही मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या विध्यार्थाना शालेय टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक घेऊन यशाची उंची गाठली आहे. १७ वर्षाखालील विधार्थानी वॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहे.

तसेच कॅरम स्पर्धेत द्वित्तीय क्रमांक पटकावले, विधार्थी महेश कोठारे यांनी शाळेचे नाव उज्वल केले असून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.

तसेच कुस्ती स्पर्धेत अकरावीत शिकत असणारी विधार्थिनी युगाश्री संजय पदमेकर हिने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. या क्रीडास्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडू विधार्थांचे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित संस्थचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर, तसेच शिक्षकांनी कौतुक केले आहे. विधार्थाना मार्गदर्शन व क्रीडाशिक्षक सचिन चापले, निलेश कामडे यांनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये