Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दारुची अवैध विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

दुचाकी वाहनासह 1 लाख 14 हजारावर देशी विदेशी दारुसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 30/12/2024 रोजी मुखबीरकडून मिळालेल्या खात्रिशिर खबरेवरून सुभाष कलसे रा. आलोडी याचे राहते घरी दारूबंदी छापा घातला असता घरझडतीत व आरोपीतांचे ताब्यातुन 1) रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेषी दारुने भरलेल्या सिलबंद 06 षिषा 2) ऑफीसर चॉईस ब्ल्यु कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेषी दारुने भरलेल्या सिलबंद 07 शिश्या 3)ऑफीसर चॉईस कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेषी दारुने भरलेल्या सिलबंद 06 शिशा 4)ओल्ड मंन्क कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेषी दारुने भरलेल्या सिलबंद 05 शिश्या 5)टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम.एल.च्या देषी दारुने भरलेल्या सिलबंद 13 शिशा 6) दारु विक्रीचे नगदी रु. 2,640/-रू., 7)एक सॅमसंग कंपनीचा जुना वापरता फ्रिज 8)एक पांढऱ्या रंगाची ज्युपीटर कंपनीची जुनी वापरती मोपेड क्र. एमएच-32-एवाय-3254 9)एक लालसर रंगाची ज्युपीटर कपंनीची जुनी वापरती मोपेड क्र. एमएच-32-एएफ-1266 एकुण 1,14,290/-रु. चा माल जप्त करण्यात आला. आरोपी 1)सुभाष कलसे 2)पोर्णीमा सुभाष कलसे दोन्ही रा. आलोडी, ता. जि. वर्धा व 3) अनिकेत शेखर गजभिये, रा. सावजी नगर, कारला रोड, वर्धा यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करुन कार्यवाही करण्यात आली.

 सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, सचिन सोनटक्के, मंगेश झामरे नापोशि. गजानन कठाणे, पो.शि. वैभव चरडे, मपोशि प्रियंका मोहर्ले यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये