ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी विद्यार्थ्यांची गावात वास्तव्यासह शेतीची अभ्यास यात्रा

तालुक्यातील शेगाव गावात विद्यार्थ्यांची कृषी विषयकअभ्यास भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती अभ्यासाच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेगांव या ग्रामीण भागात नुकतीच अभ्यासभेट दिली.

         या भेटीचा उद्देश गावातील पारंपरिक व आधुनिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, शेतकऱ्यांशी संवाद साधणे व स्थानिक अडचणी समजून घेणे असा होता.

         विद्यार्थ्यांनी गावात थेट मुक्काम करून काही दिवस तेथील वातावरण, शेतीची साधने, सिंचन पद्धती, पीक रचना व जैविक तंत्रज्ञान यांचा अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीतील प्रयोगशीलता, नैसर्गिक शेती, शेतीतील यांत्रिकीकरण, बाजारपेठेतील समस्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्या व त्यांच्या शेतीतील समस्या जाणून घेतल्या.

       या अभ्यास दौऱ्यात वैभव शेडामे, आदर्श पांडेय, पंकज घुगुसकर, करण बघेले, तेजस गाडेकर, सौरभ भांडेकर आणि हर्षल आत्राम तसेच गावचे सरपंच मोहित लभाने यांनी विद्यार्थ्यांचे गावामध्ये स्वागत करत विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये