Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नागपूर येथील वसंतराव नाईक परसबागेत, गच्चीवरील भाजीपाला लागवड कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अँग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे दिनांक 28 डिसेंबर 2024 रोज शनिवारला गच्चीवरील भाजीपाला लागवड या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अँग्रोव्हिजन फाउंडेशनचे सल्लागार, प्रसिद्ध कृषि शास्त्रज्ञ, परभणी कृषि विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. सी. डी. माई सर, व कॅप्टन डॉ. एल बी कलंत्री सर हे उपस्थित होते.

समग्र विकास क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव परसबागेचे निर्माते ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे श्री.श्रीपत राठोड व सौ.जयश्री राठोड तसेच कु.अंजली व कु. दिपाली राठोड उपस्थिती होते.

या कार्यशाळेत आरोग्याच्या विषयावर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्येवर गटचर्चा झाली, पावर पोईट सादरीकरणातून अनेक महत्वपूर्ण मुद्दे सहभागीतांच्या मनावर बिंबविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

तसेच प्रत्यक्षथेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर साकारलेल्या वसंतराव नाईक परसबागला भेट देऊन गच्चीवरील भाजीपाला लागवडी संबंधित सर्व तांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने चर्चात्मक पद्धतीने महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.घरच्या घरी रोज आपल्याला लागणारा विषमुक्त ताजा.भाजीपाला उत्पादन काढण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करून सर्व प्रशिक्षणार्थींचे प्रश्न व शंका समाधान करण्यात आले.

या प्रशिक्षणाला सर्व वयोगटातील प्रशिक्षणार्थी उत्स्फूर्त संख्याने उपस्थित होते. सर्व सहभागीतांना ज्ञानप्रकाशचे श्रीपतराठोड आणि सौ. जयश्री राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये