ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद क्षेत्रातील वडाळा पैकू जुनी वस्तीत घाणीचे साम्राज्य

नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील वडाळा पैकु जुन्या वस्तीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर परिषदच्या विरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

       नगर परिषद चिमूर, प्रभाग क्र ३/४ मधील, गटारी तुडुंब भरली असून,२वर्षांपूसन नाली उपसा करण्यात आले नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.गटारे मध्ये अळ्या, कीटक पडली असून मच्छर चा प्रादुर्भाव वाढला आहे.याकडे न प चिमूर कडून अजूनपर्यंत दखल घेतली नाही ही शोकांतिका आहे.तसेंच बोरवेल नांदुरुस्त, सर्व,विहीर भोवती काटेरी झाडें व घाण साचली आहे काही विद्युत पथदिवे बंद अवस्तेत आहे,या गंभीर समस्या कडे प्रशासन का लक्ष देत नाही याची खंत वाटते. केवळ कर वसुली करून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही.

५/६ वर्षपासून दूषित नळ पाणी पुरवठा शुरु असून याकडे सुद्धा दुर्लक्षित आहे. नगर परिषद अखेर काय साध्य करणे आहे हे एक कोडच आहे. वडाळा ग्रामपंचायत स्वतंत्र होती तेव्हाच जनतेला सर्व नागरी सुविधा परिपूर्ण मिळायच्या परंतु हल्ली नगर परिषद मध्ये समाविष्ट करून पश्चाताप होत असल्याची नागरिकांना खंत वाटत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये